धोनी, विराट, चहल, पांड्या नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत


पाच दिवसांच्या ब्रेक नंतर बुधवारी सरावासाठी टीम इंडिया मैदानात उतरली तेव्हा काही खेळाडूंच्या हेअरस्टाईल ने सोशल मिडीयावर क्रिया प्रतिक्रियांना उधाण आले आहे. अटीतटीच्या सामन्याचे स्वरूप मिळालेल्या आयसीसी वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेत टीम इंडियाने पाकिस्तानला पाणी पाजल्यावर मिळालेल्या पाच दिवसांच्या ब्रेकचा टीम इंडियाने पुरेपूर फायदा घेतला असून या काळात कुटुंबियांसमवेत वेळ घालविण्याबरोबर टीम इंडियाचा कप्तान विराट, विकेटकीपर धोनी, ऑल राउंडर हार्दिक पंड्या आणि लेगस्पिनर युवराज चहल यांनी स्वतःचा खास मेकओव्हर करून घेतलेला दिसतो आहे. त्यांची नवी हेअरस्टाईल आकर्षणाचा विषय बनल्याचे दिसून येत आहे.


लंडन मध्ये प्रसिद्ध हेअरड्रेसर आलीम हकीम यांनी या चौघाच्या केसांना वेगळे वळण दिले असून त्यांनी स्वतः त्याचे फोटो त्यांच्या ट्विटर अकौंटवर शेअर केले आहेत. धोनी पूर्वीपासूनचा त्याच्या खास हेअरस्टाईल मुळे चर्चेत राहिला आहे आता हार्दिक पंड्या टीम इंडियासाठी नवा ट्रेंड सेट करताना दिसतो आहे. कोहली आणि धोनीची नवी हेअरस्टाईल जवळजवळ सारखी दिसते आहे.


आलीम हकीम हे नावाजलेले हेअरस्टाईलिस्ट असून अनेक सेलेब्रिटी त्यांचे ग्राहक आहेत. त्यांनी धोनी आणि चहलचे केस कापतानाच्या सेल्फी त्यांच्या इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर करताना खाली लंडन मध्ये हेअरकट सेशन जारी असे कॅप्शन दिले आहे. टीम इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर सुद्धा या चौघा खेळाडूंचे नवीन हेअरस्टाईल मधले फोटो शेअर केले गेले आहेत. हार्दिक पंड्याने या वर्ल्ड कप साठी खास बनवून घेतलेले हिरे दागिने चर्चेत आहेतच त्यात आता नव्या हेअरस्टाईलची भर पडली आहे.

उद्या म्हणजे शनिवारी २२ जुलै रोजी फ्रेश लुक मधले मेन इन ब्ल्यू म्हणजे टीम इंडिया अफगानिस्तान सोबत सामना खेळणार असून आत्तापर्यंत झालेल्या चार सामन्यात टीम इंडियाने तीन विजय मिळविले आहेत तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

Leave a Comment