चक्क संघाची सदिच्छा दूत झाली प्रियंका!


बॉलीवूडसह हॉलीवूड आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर या ना त्या कारणामुळे सतत ट्रोल होत असते. तिने सोशल मीडियावर काहीही शेअर करो त्यानंतर ट्रोलर्स तिची पाठ सोडायला तयार होत नाहीत.


काही ट्रोलर्सनी तिने अलिकडे परिधान केलेल्या ड्रेसची तुलना संघाच्या गणवेशाशी केली आहे. खाकी कलर्सची शॉर्ट, त्यावर काळ्या रंगाचा टॉप आणि ओवरकोट तिने घातला आहे. हा फोटो शेअर होताच ट्रोलर्सची टोळी जागी झाली आणि तिच्यावर तुटून पडली. हा फोटो न्यूयॉर्कच्या अपार्टमेंट बाहेरचा आहे. प्रियंका आणि तिचा पती अपार्टमेंटमधून बाहेर पडताना घेतला गेलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर भरपूर शेअर केला जातो आहे.

हा फोटो पाहून एका युजरने लिहिले आहे की, प्रियंका चोप्राची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदिच्छा दूत पदी निवड करण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका युजरने ‘आरएसएस स्वॅग’, असे म्हटले आहे.

Leave a Comment