ही दाक्षिणात्य अभिनेत्री देत आहे मलायकाला टक्कर


दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री हिना पांचाळ हिचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता असल्यामुळे तिला मलायकाची डुप्लिकेट म्हणून देखील ओळखली जाते. २०१४ साली हिना पांचाळने आपल्या फिल्मी करिअर सुरूवात केली होते. पण तिला अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून अधिक प्रसिद्धी मिळाली.

अनेक दाक्षिणात्य चित्रपटात हिनाने आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. सोशल मीडियावर देखील हिना कमालीची सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करत असते.

तिने बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. मलायका जितकी हॉट आणि बोल्ड आहे, तितकीच हिनाही हॉट आणि बोल्ड आहे. हिना व मलायका एका इव्हेंटमध्ये एकमेकांसमोर आल्या होत्या. स्वत: मलायकाही हिनाला पाहून अवाक् झाली होती. हिनाचे सोशल मीडियावरील फोटो खूप बोल्ड आहेत.

Leave a Comment