‘नो एंट्री’च्या सिक्वेलमध्ये तारा सुतारियाची एन्ट्री?


बॉक्सऑफिसवर म्हणावा तितका प्रभाव स्टुडंट ऑफ द ईअर हा चित्रपट पाडू शकला नाही. पण या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. तिच्या घराबाहेर या चित्रपटानंतर नवनव्या चित्रपटांसाठी निर्मात्यांची रांगच लागली. आता कदाचित ‘नो एन्ट्री’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये तिची एन्ट्री झाल्याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये आहे.

ताराची स्टुडंट ऑफ द ईअर या चित्रपटातील टायगर श्रॉफ सोबतची केमिस्ट्री चांगली रंगली. पण अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकला नाही. तरीही या चित्रपटातील ताराचे काम पाहता तिच्यामागे अनेक चित्रपटांची जणू रांगच लागली. ताराने काही दिवसांपूर्वीच ‘मरजावा’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले असून ती यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंहसोबत झळकणार आहे. त्याचबरोबर सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी सोबत आरएक्स 100च्या हिंदी रिमेकमध्ये स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटांसोबतच ‘नो एन्ट्री’ च्या सिक्वेलमध्ये ती दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ती यासंदर्भात या चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बझ्मी यांना नुकतीच भेटल्याचेही सांगण्यात येत आहे. अर्जुन कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment