सोनाक्षीच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज


सध्या ‘दबंग ३’च्या चित्रीकरणात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व्यस्त असतानाच प्रेक्षकांच्या भेटीस तिचा आणखी एक चित्रपट येण्यास सज्ज झाला आहे. नुकतेच ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


सोनाक्षीसोबतच या पोस्टरमध्ये अभिनेता वरुण शर्मा, अन्नु कपूर आणि रॅपर बादशाहाची झलकदेखील पाहायला मिळत आहे. पण बहुतेक कलाकारांचे पोस्टरमधील चेहरे झाकलेले आहेत. ‘मैं जितना बोलूंगी लोगों को उतनी ही शर्म आनी है’, अशी टॅगलाईन या पोस्टरवर देण्यात आली आहे.

दरम्यान अद्याप चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर येत्या २ दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे तरण आदर्श यांनी ट्विट करत सांगितले आहे. शिल्पी दासगुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर निर्मिती भूषण कुमार, महावीर जैन आणि म्रीघदीप सिंग लंबा यांची आहे. हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment