आता २४ डब्यांची होणार मांडवी, कोकणकन्या एक्सप्रेस


मुंबई : आता १ सप्टेंबरपासून चाकरमान्यांची लोकप्रिय कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेस २४ डब्यांची करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत होणार आहे.

मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून २२ डब्यांसह चालविण्यात येणाऱ्या मांडवी आणि कोकणकन्या एक्सप्रेस वाढत्या गर्दीमुळे २४ डब्यांची करण्याची मागणी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी केली होती. या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेत, गर्दी कमी करण्यासाठी कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसमधील डब्यांची संख्या २४ केली जाणार आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची यासाठी बैठक घेण्यात आली. कोकण रेल्वे अधिकाऱ्यांकडून कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांची वाढ करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्याचे, कोकण रेल्वे जागृत संघाचे सचिव विलास पावसकर यांनी सांगितले. त्यानुसार, १ सप्टेंबरपासून २४ डब्यांसह मांडवी आणि कोकणकन्या एक्सप्रेस धावेल.

Leave a Comment