सौदी अरेबियाच्या युवराजाचे खशोग्गींच्या हत्येशी कनेक्शन


जिनिव्हा – मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या सौदी पत्रकार जमाल खशोग्गी यांच्या हत्येशी संबंधित ठोस पुरावे मिळाले आहेत. सौदी अरेबियाच्या युवराजाचा या हत्येशी संबंध असल्याचे संयुक्त राष्ट्रांतर्फे दिलेल्या तज्ज्ञांच्या एका स्वतंत्र अहवालात म्हटले आहे. हे पुरावे मिळाल्याचे संयुक्त राष्ट्रांसाठी स्वतंत्रपणे शोध करणाऱ्या तज्ज्ञाने सांगितले आहे.

याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधी अॅग्नेस कॅल्लामार्ड यांनी शोध केला. त्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील अशा प्रकारच्या अनियंत्रित हत्यांच्या संदर्भात विशेष प्रतिनिधी म्हणून काम करतात. सौदी युवराजांनीच ही हत्या घडवून आणल्याचे ठोस पुरावे मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, सौदी अरबच्या उच्चाधिकाऱ्यांची प्रत्येकाला व्यक्तिगतरीत्या या प्रकरणी प्रश्न विचारून चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

या हत्येशी सौदी क्राऊन प्रिन्सचा संबंध असल्याचे विश्वसनीय पुरावे मिळाले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञ अॅग्नेस यांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणी चौकशी सुरू करण्याची गरज असल्याचे अॅग्नेस यांनी म्हटले आहे.

पत्रकारांचे स्वातंत्र्य धोक्यात असल्याचा मुद्दा खशोगी यांच्या हत्येने अधोरेखित केला होता. तसेच, या हत्येचा मानव अधिकार कार्यकर्त्यांनीही निषेध केला होता. या हत्येविषयी जगभरातील नेते, अमेरिकन सिनेटर्स यांनी दुःख व्यक्त केले होते. या प्रकरणात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीआयएच्या चौकशीतून आलेल्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी मध्य-पूर्वेतील आपला मित्रदेश सौदीवर कोणताही दंड लागू केला नाही.

सौदी राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनीच खशोग्गी यांच्या हत्येचा आदेश दिला होता, असे सीआयएने म्हटले होते. याविषयीचे पुरावेही सीआयएकडे आहेत. इस्तंबूल येथील सौदी वाणिज्य दूतावासात खशोग्गी यांची मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये हत्या झाली होती. आपल्याशी सौदीने साधा संपर्कही न साधल्याचे खशोग्गी यांच्या प्रेयसीचे म्हणणे आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment