बिहारमध्ये एक लाख रुपये कर्ज घेऊन बांधले हवा-हवाई टॉयलेट


बेगुसराय – बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील हे छायाचित्र असून १८ फूट उंचावरील स्वच्छतागृहात येथील लोकांना शिडी लावून जावे लागते. येथील बछवाडा ब्लॉकमधील रानी गावात बांधण्यात आलेले शौचालय चमचम देवी व मीनादेवी यांचे आहे.

एक लाख रुपये कर्ज घेऊन या महिलांनी शौचालय बांधले. शौचालय बांधण्यासाठी असलेल्या जमिनीवर एक मोठा खड्डा होता. कर्मचाऱ्यांनी महिलांना गावाला हागणदारीमुक्त जाहीर करण्यासाठी म्हटले, खड्ड्यात शौचालय बांधून घ्या. नंतर तो खड्डा आम्ही मनरेगा योजनेतंर्गत भरून काढतो. तीन कुटुंबातील लोक मुख्यालयात चकरा मारून थकले. पण खड्डाही भरला नाही आणि शौचालय बांधण्यासाठी खर्च झालेली रक्कम देण्यात आलेली नाही. मात्र शिडीवरून पुरुषांना शौचालयात जाणे भाग पडत आहे.

Leave a Comment