लवकरच भारतात येताहेत रेडमी के २० आणि के २० प्रो


शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनुकुमार जैन यांनी कंपनीने चीन मध्ये नुकतेच लाँच केलेले रेडमी के २० आणि रेडमी के २० प्रो हे जगातील वेगवान स्मार्टफोन पुढच्या महिन्यात भारतीय बाजारात दाखल होत असल्याचे संकेत दिले आहेत. जैन यांनी त्यांच्या ट्विटर अकौंटवर त्यांचा बॉक्सिंग ग्लोव्ह्स हातात घातलेला एक फोटो शेअर केला असून या ग्लोव्ह्सवर रेडमी के २० अशी अक्षरे आहेत.


हे फोन भारतात नक्की कोणत्या तारखेला आणि किती किमतीला मिळणार हे समजले नसले तरी ते चीन मध्ये ज्या किमतीत उपलब्ध करून दिले गेले आहेत त्याच किमतीत मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चीन मध्ये रेडमी के २०च्या ६ जीबी रॅम, ६४ जीबी मेमोरीची किंमत २० हजार रुपये, ६ जीबी रॅम, १२८ जीबी साठी २१ हजार तर ८ जीबी रॅम, १२८ जीबी साठी २६ हजार रुपयादरम्यान आहे. याच किमती रेडमी के २० प्रो साठी अनुक्रमे २५ हजार, २८,२०० व ३०,२०० रुपये अश्या आहेत.

रेडमी के २० प्रोसाठी ६.३९ इंची एमोलेड फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर, अँड्राईड नाइन पाय ओएस, ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. कॅमेरा सेट ४८ एमपी, १३ व ८ एमपीचा असून सेल्फीसाठी २० एमपीचा पॉपअप कॅमेरा दिला गेला आहे. यात व्हिडीओ कॉलिंग फिचर आहे. फोनसाठी ४००० एमएएच ची फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी दिली गेली आहे. के २० चे डिझाईन आणि फीचर्स के २० प्रो प्रमाणेच आहेत. फक्त प्रोसेसर, बॅटरी आणि रॅम वेगळे आहेत असे समजते.

Leave a Comment