नव्या बाँड चित्रपटासाठी अॅस्टन मार्टिनची हायपरकार रेडी


पाच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २०२० मध्ये बाँड वेड्या प्रेक्षकांना नव्या बाँडपटाची मेजवानी मिळणार असून त्यासाठी लक्झरी कार निर्माती कंपनी अॅस्टन मार्टिनने नवी सुपरकार तयार केली आहे. या हायपरकारची किंमत १३ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या चित्रपटासाठी स्टाईल, अॅक्शन आणि लार्जर देन लाईफ इमेज देण्याची जोरदार तयारी सुरु आहे आणि ही जबाबदारी स्लमडॉग मिलेनिअर साठी ऑस्कर मिळालेले दिग्दर्शक डॅनी बोयाल यांच्यावर सोपविली गेली आहे. एजंट ००७ म्हणून पुन्हा एकदा डेनियल क्रेग दिसेल.


अॅस्टन मार्टिनची ही नवी हायपरकार सध्या पॉवर आणि लुकमुळे चर्चेत आली आहे. डेली मेलच्या बातमीनुसार या कारसाठी वलहला असे आकर्षक नाव ठरविले गेले आहे. लोकप्रिय टीव्ही सीरिअल वायकिंगवरून प्रेरणा घेऊन हे नाव निश्चित केले गेले असून त्याचा अर्थ आहे योध्यांचा स्वर्ग. ही हायपर कार AM- RB-००३ या कोडनेमने सर्वांसमोर सादर करण्यात आली आहे.


या हायपरकारचा वेग ताशी ३२१ किमी असून कंपनीने ती खास जेम्स बाँड २५ साठीच तयार केली आहे. गेल्या सात दशकांपासून अॅस्टन मार्टिन व्ही या अक्षराने सुरु होणारी नावे त्यांच्या सुपरकार्स साठी देत आहे. २०१५ च्या बाँडपटात स्पेक्ट्रे डीबी १० कार वापरली गेली होती. ते काल्पनिक मॉडेल होते व फक्त चित्रपटसाठी वापरले गेले होते. मात्र आता नव्याने तयार केली गेलेली वलहला हायपरकार कुणीही खरेदी करू शकणार आहे फक्त त्यासाठी खिशात १३ कोटी रुपये हवेत.

या चित्रपटात आणखी दोन कार दिसतील. १९६० च्या दशकात वापरलेली डीबी ५ व १९८० च्या दशकात वापरलेली व्ही ८ यांचा समावेश आहे. या आगामी चित्रपटात खलनायक लँडरोव्हरच्या नव्या डिफेंडर कार मधून पळून जाताना दिसतील.

Leave a Comment