पाकच्या 32 खेळाडूंना भेटत नाही तेवढे विराटला मिळते वेतन


आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर पाक खेळाडूंवर चोही बाजूंनी टीका होत आहे. तर पाकिस्तानी माध्यमांनी संघात गट पडल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. कर्णधार सर्फराज अहमदने चाहत्यांच्या रागाची एवढी धास्ती घेतली आहे की, एकटा पाकिस्तानला मी जाणार नाही. आपण सर्वांनी देशातील लोकांसमोर जायचे असेच त्याने सहकारी खेळाडूंना बजावले आहे.

दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंच्या वेतनाची चर्चा आता जोरात सुरू आहे. बीसीसीआय ज्याप्रमाणे भारतीय खेळाडूंना वेतन देते तसेच वेतन पीसीबीकडून पाकिस्तानी खेळाडूंनी दिले जाते. ग्रेडनुसार त्यांचेही वेतन ठरते. तर पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंचे वेतन मिळून 7 कोटी 53 लाख रुपये आहे. ए ग्रेडमध्ये पाकिस्तानच्या 6 खेळाडूंचा समावेश आहे. वर्षाला त्यांना 48 लाख रुपये वेतन दिले जाते. तर बी ग्रेडमधील खेळाडूंना 30 लाख रुपये वर्षाला मिळतात. त्यात पाकच्या 6 खेळाडूंचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या सी ग्रेडमधील खेळाडूंना 21 लाख रुपये वेतन वर्षाला दिले जातात. यात 9 खेळाडूंचा समावेश आहे. डी ग्रेडमध्ये 5 खेळाडू असून त्यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 12 लाख रुपये वेतन देते. पाकिस्तानच्या इ ग्रेडमधील खेळाडूंना वर्षाला 6 लाख रुपये दिले जातात. इ ग्रेडमध्ये पाकचे 6 खेळाडू आहेत.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक करारात ए श्रेणीत एक वर्षापूर्वी संघात आलेल्या ऋषभ पंतने स्थान पटकावले. या करारामुळे त्याला वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. बीसीसीआयने ए+ श्रेणीत कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश केला आहे. वर्षाला या तिघांनाही 7 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

ए श्रेणीमध्ये भारताला तीनही प्रकारात विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंह धोनी असून कर्णधार विराट कोहलीसह तीन खेळाडूंचा समावेश ए+ श्रेणीत करण्यात आला आहे. ए श्रेणीमध्ये ऋषभ पंतसोबत 11 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महेंद्र सिंह धोनीसह आर अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे.

बी श्रेणीत हार्दिक पांड्या, के एल राहुल, उमेश यादव, युझवेंद्र चहल यांचा समावेश करण्यात आला आहे. वर्षाला त्यांना तीन कोटी रुपये मिळणार आहेत. सी श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला 1 कोटी रुपये दिले जातात. या श्रेणीत केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायडु, मनिष पांडे, हनुमा विहारी आणि वृद्धिमान साहा यांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment