इंटरनेट वापरात ‘हा’ देश अव्वल स्थानी


नवी दिल्ली – रिलायन्स कंपनीची जिओ सेवा भारतात उपलब्ध झाल्यानंतर झपाट्याने इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार, भारत जगात इंटरनेट वापरात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ही माहिती मेरी मीकर यांच्या इंटरनेटच्या वापरावर आलेल्या अहवालात समोर आली आहे.

अहवालानुसार, एकूण ३ अब्ज ८० लाख इंटरनेट वापरकर्ते जगात आहेत. जगातील लोकसंख्येपैकी ही संख्या अर्धी आहे. यामध्ये चीन २१ टक्क्यांसह जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारत १२ टक्के इंटरनेट वापरकर्त्यांसह दुसऱ्यास्थानी आहे. तर, ८ टक्के इंटरनेट वापरकर्ते अमेरिकेत आहेत.

इंटरनेट वापरकर्त्यांच्या जगभरातील संख्येत वाढ होत आहे. ६ टक्के वृद्धी २०१८ साली झाली होती. परंतु, २०१७ साली झालेल्या ७ टक्यांच्या तुलनेत यामध्ये घट दिसून आली आहे. जिओने ५ सप्टेंबर २०१६ साली भारतीय बाजारपेठेत पाऊल टाकले होते. इंटरनेट ग्राहकांत स्वस्त सेवेमुळे कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. जिओच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही यामुळे दर कमी करावे लागले होते. जिओ सध्या अग्रेसर असून जिओचे भारतात ३० कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत.

Leave a Comment