हे यूट्युबर आजच्या घडीला आहेत सर्वात लोकप्रिय


सध्या आपण डिजीटल युगात वावरत असून आपल्यातला प्रत्येकजण हा इंटरनेटशी जोडला गेला आहे. त्यातच सोशल मीडिया हा त्यातील सर्वात प्रभावी साधन ठरत आहे. या सोशल मीडियाच्याच माध्यमातून कित्येकजण एकाच रात्रीत प्रकाशझोतात आले आहेत. त्यातच युट्यूब हा सोशल मीडियातील एक प्लॅटफॉर्म असून ज्याच्या माध्यमातून तुम्ही देखील रोजगार मिळवू शकता. तर आज आम्ही तुम्हाला काही युट्यूबरची माहिती देणार आहोत, जे या माध्यमातून पैसे कमवत आहेत.

BB Ki Vines या यू ट्युब चॅनेलवरून भुवन बाम हा प्रेक्षकांचे मनोजरंज करत असतो. BB Ki Vinesहा देशातला पहिला यू ट्युब चॅनेल आहे, ज्याने सर्वात आधी यश मिळवले आहे.

आपल्या विनोदी शैलीमुळे यू ट्युबवर अमित भडानाही प्रसिद्ध आहे. तो आपल्या कलेने प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.

यू ट्युबवर टेक्नॉलॉजी गुरू म्हणून गौरव चौधरी प्रसिद्ध असून त्याचे यू ट्युबवर 2260926 एवढे फॉलोअर्स आहेत.

जबरदस्त स्पीकर असलेला संदीप माहेश्वरी लोकांना स्वभावाचे विशेषगुणांचे महत्त्व सांगतो. यू ट्युबवर संदीपचे 10712383 फॉलोअर्स आहेत.

अजय नागर यांचा आवाजच त्यांची ओळख आहे. हरियाणातील अजय यांच्या यू ट्युब चॅनेलचे नाव CarryMinati असून, त्यांचे 7010012 फॉलोअर्स आहेत.

Leave a Comment