2000 कोटींचा घोटाळा, 4 पत्नी, आणि बनावट आत्महत्या


कर्नाटकातील पोंजी स्किम आयएमए फसवणूक प्रकरणातील आरोपी मन्सूर खान याच्या तिसऱ्या पत्नीकडून जप्त 33 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोंजी स्किमच्या माध्यमातून 2,000 कोटी रुपयांची लोकांची फसवणूक करुन मंसुर चौथ्या पत्नीसह दुबईला फरार झाला आहे. हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या मंसुर खानचा इतिहास देखील मनोरंजक आहे. रस्त्यावरचा भिकारी एकाच रात्रीत कसा श्रीमंत होतो याचे ताजे उदाहरण आहे मंसुर खान. आत्महत्याचा ऑडिओ सोडल्यानंतर मंसूर दुबईला पळून गेला.

माध्यमांच्या अहवालानुसार, 1950 च्या दशकात मोहम्मद मंसूर खान यांचे कुटुंब तामिळनाडूहून बेंगलुरु येथे स्थलांतरित झाले. 18 व्या वर्षी, मन्सूरने ठरविले की तो महाविद्यालयात जाण्याऐवजी काही काम करेल. याचा विचार करुन त्याने सेल्स रिप्रेझेटिटीव्ह म्हणून काम सुरु केले. काही काळानंतर, त्याला जाणवले की त्याला नोकरी मिळावी, यासाठी बी. कॉम करण्यासाठी बंगळुरु विद्यापीठात प्रवेश घेऊन अभ्यास सुरु केला. पण अभ्यास करुन ही नोकरी न मिळाल्याने तो 1990 साली दुबईत गेला आणि त्याने त्याच्या नातेवाईकांबरोबर दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला. येथे मन्सूर खानने सोन्याच्या धंद्यातील बारकावे शिकून घेतले. त्यानंतर तो पुन्हा भारतात परतला आणि त्यांनी चेन्नईतील दागिने डिझाइनच्या क्षेत्रात स्नातकोत्तर डिप्लोमा मिळविला.

मग मन्सूर खानने प्रचंड मोठी उडी घेतली. त्याने हीरा इस्लामिक बिझिनेस ग्रुपसोबत काम केले, जो विवादित नोहेरा शेख यांचा होता. येथे त्याने पोंझी योजनेतून पैसे कमविण्याबद्दल शिकले आणि ‘हलाल’ इंव्हेस्टमेंट या व्यवसायाची उभारणी केली. येथे स्वस्त सोन्याचे कसे खरेदी करावे आणि उच्च किंमतीत सोन्याचे कसे खरेदी करावे हे मन्सूरला माहित झाले होते. आणि 2006 मध्ये आयएमए ज्वेल्सच्या नावाखाली त्यांनी आपला पहिला व्यवसाय सुरू केला.

येथे, मन्सूर खानने वित्तीय सल्लागार कंपनी उघडण्याचा निर्णय घेतला. ज्या शिवाजीनगर भागात मंसूर राहत होतो. त्याच ठिकाणी असलेल्या गंगस्टर्सची मन्सूरने आपला व्यवसाय वाढीसाठी मदत घेतली. गँगस्टर इलियासने मंसूरच्या कंपनीत 50 लाख रुपये गुंतविले. येथे इलियास गुंतवणूकदार आणि मन्सूर यांना विक्रीदार म्हणून दाखविण्याचा पूरेपुर वापर अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी केला गेला. येथेच इलियास आणि मंसूरच्या आयएमएची खरी सुरुवात झाली.

तोपर्यंत त्याच्या व्यवसायात काय गांभीर्य आहे हे कोणीच गंभीरपणे घेतले नव्हते. ज्या लोकांबरोबर तो काम करत होता त्यांच्यामुळे त्याची इमेज खराब होत होती म्हणून 2008 मध्ये त्याने कंपनी विसर्जित केली.

डिसेंबर 2013 मध्ये, मन्सूर खानने धार्मिक नेत्यांच्या माध्यमातून दूसरा मार्ग अवलंबला. त्यांनी धार्मिक नेते आणि त्याच्या समुदायासाठी त्याने गुंतवणूक योजना आणली. एक कोटी गुंतवणूकीतून मन्सूरने त्यांच्या जवळील नासीर हुसेन यांच्यासह आपली स्वतःची आर्थिक सल्लागार कंपनी सुरू केली.

Leave a Comment