अवघ्या 6 लाखात खरेदी केले आलिशान घर… आणि मग


दक्षिण फ्लोरिडा: स्वस्त किंमतीत एखादे आलिशान घर भेटले तर आपल्या आनंदाला पारावार उरणार नाही. असेच एक घर एका व्यक्तीने खरेदी केले, प्रत्यक्षात एका व्हिलाचा ऑनलाइन लिलाव चालू होता. घर फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत होते. म्हणून या व्यक्तीने विचार केला की आपण या घरात पैसे गुंतवले पाहिजे. कारण तो व्हिला खूपच आलिशान होता. सुदैवाने त्याने या लिलावात ते घर विकत घेतले. घराची खरेदी केल्यानंतर, त्या व्यक्तीच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता.

पण जेव्हा तो हे घर पाहण्यासाठी प्रत्यक्षात पोहचला तेव्हा त्याला एक जोर झटका लागला. या व्यक्तीने दक्षिण फ्लोरिडामध्ये 6.3 लाख रुपयात व्हिला विकत घेतला, वास्तविक किंमत अंदाजे 1 कोटी 23 लाख रुपये ऐवढी होती पण त्याला हे 6.3 लाखातच मिळाले. पण जेव्हा तो व्हिलाजवळ पोहोचला तेव्हा त्याला कळले की त्याला या किंमतीत 1 फुट रुंद आणि 100 फूट लांब एक गवताची पट्टी भेटली आहे.

सन-सेंटीनेलच्या वृत्तानुसार या पट्टीची मालकीन कर्विल होलनेस यांच्यावर नावावर ही गवताची पट्टी उगवली होती, जी पट्टीमागे उगवलेल्या घराच्या सदस्या होत्या. घराचा ऑनलाईन लिलाव करणाऱ्या कंपनीने घराच्या सोबतच या गवताच्या पट्टीला देखील लिलावासाठी ठेवले होते. जी त्या व्यक्तीला 6.3 लाखाला पडली आणि त्याला वाटले की आपण एवढ्या किंमती पूर्ण घरच विकत घेतले.होलनेस लिलाव करणाऱ्या वेबसाइटवर चुकीची माहिती देण्याचा आरोप करत आपले पैसे परत करण्याची मागणी देखील केली आहे. पण आता आपले पैसे परत मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

Leave a Comment