ट्रूकॉलर व्हॉईसद्वारे आता करता येणार ‘फ्री इंटरनेट कॉल’


आता आपल्या अॅपद्वारे इंटरनेट कॉलिंगची सुविधाही ट्रूकॉलर हे मोबाईल अॅप्लिकेशन बनवणाऱ्या कंपनीने उपलब्ध करुन दिली आहे. याचा वापर ट्रूकॉलरच्या जगभरातील जवळपास 140 कोटी युजर्सना करता येणार आहे.

ऑनलाईन विश्वातील ट्रूकॉलर ही सध्याची सर्वात मोठी टेलिफोन डिरेक्टरी मानली जाते. अनेक जण ट्रूकॉलर अॅपचा वापर एखादा अज्ञात मोबाईल किंवा लँडलाईन क्रमांक नेमका कोणाचा आहे याचा शोध घेण्यासाठी करतात. हे अॅप या फिचरमुळे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्यानंतर आता कंपनीने ‘ट्रूकॉलर व्हॉईस’ या नावाने इंटरनेट कॉलिंगची सेवा सुरु केली आहे. VoIP बेस्ड ही सेवा असून ट्रूकॉलर अॅपद्वारे वायफाय किंवा मोबाईल डेटाचा वापर करुन कॉल करता येणार आहे.

ट्रूकॉलर भविष्यात अॅपद्वारे युजर्सना कॉल, टेक्स्ट मेसेज, इन्स्टंट मेसेज यासोबत डिजीटल पेमेंटही करता यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. सुरुवातीला ‘ट्रूकॉलर व्हॉईस’ ही सेवा अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात असून पुढच्या काही आठवड्यांत ही सेवा आयओएस युजर्सना मिळणार आहे.

Leave a Comment