बॉलीवूडच्या मस्तानीला मिळाला जगातील सुंदर महिला होण्याचा बहुमान


बॉलीवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यातच आता तर जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत तिने वरचे स्थान पटकावले आहे. दीपिकासोबतच या यादीत स्कारलेट जॉनसन, एंजोलिना जॉली, ब्लेक लाइवली, हाले बेरी, बेयोंसे, एम्मा वॉटसन यांची नावे देखील सामील आहेत.

दीपिकाच्या कपड्यां एवढीच तिच्या सौंदर्याची मेट गालामध्ये ही चर्चा झाली. दीपिका गतवर्षी रणवीर सिंहसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पहिल्यांदाच ती रणवीर सिंहसोबत ‘८३’मध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘८३’ हा चित्रपट भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. या चित्रपटाची शूटिंग सध्या लंडनमध्ये सुरु आहे.

दीपिकाने नुकतेच छपाक चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. छपाक चित्रपटातून दीपिका पादुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षाची आणि खडतर प्रवासाची कथा रेखाटण्यात आली आहे. यात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे. तर विक्रांत लक्ष्मीचा लिव्ह इन पार्टनर आलोक दीक्षितच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. विक्रांत आणि दीपिकाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना कितपत भावते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. हा चित्रपटा १० जानेवारी २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment