जंक फूड खाल्ल्यावर करंट मारेल हे ब्रेसलेट


चांगल्या आणि वाईट माणसातही वाईट सवयी या असतात. अनेकदा वेगवेगळ्या रिसर्चमधून जंक फूड खाणे ही एक वाईट सवय असल्याचे आले आहे. त्यामुळे घरबसल्या वजन वाढण्यासोबतच वेगवेगळे आजार होताहेत. पण आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवल्याशिवाय कधीच शांत बसणार नाही. कारण बर्गर, पिझ्झा, पाणीपुरी किंवा आणखीही काही चटपटीत पदार्थांचे जरी नाव काढले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. यावर अनेकांना कंट्रोल करता येत नाही. पण सध्या यावर एक भन्नाट उपाय समोर आला आहे.

एक असे ब्रेसलेट बाजारात आले आहे जे तुम्हाला जंक फूड खाल्ल्यानंतर करन्ट मारेल. तुम्ही जर ऑनलाइन वेळ घालवत असाल, नखे खात असाल, जास्त जेवण करत असाल, स्मोकिंग करत असाल, फास्ट फूड खात असाल किंवा जास्त झोपत असाल तर या चुकीच्या सवयी सोडवण्यासाठी बाजारात Pavlok Bracelet आले आहे.

तुम्ही जर वरील सर्व गोष्टी करत असाल तर तुम्हाला हे ब्रेसलेट करन्ट मारेल. म्हणजे हे ब्रेसलेट तुमच्या या वाईट सवयी सोडवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी तुम्हाला या ब्रेसलेटमध्ये तुमच्या चुकीच्या सवयींची एक लिस्ट तयार करायची आहे. यातील तुम्ही जी गोष्ट कराल तेव्हा तुम्हाला हे ब्रेसलेट १५० Zaps चा शॉक देईल. Pavlok Bracelet ची अ‍ॅमेझॉनवर या किंमत १९९ डॉलर म्हणजेच १३ हजार ८९३ एवढी आहे.

Leave a Comment