मोबाईल चोरीचा धोका संपविणार एरिक्सनचे नवे तंत्रज्ञान


गर्दीच्या जागी, प्रवासात तुम्ही खिशात मोबाईल ठेवला असेल तर तो चोरी होण्यची शक्यता अधिक असते. खिशात ठेवलेला मोबाईल चोरी होण्याची शक्यता संपुष्टात आणणारे एक तंत्रज्ञान स्वीडनची कंपनी एरिक्सनने विकासीत केले आहे. त्याच्या पेटंट साठी अर्ज केला गेला आहे आणि पेटंट मिळताच त्याचे उत्पादन सुरु केले जाणार असल्याचे जाहीर केले गेले आहे.


या तंत्रज्ञानामुळे चोर जसा मोबाईल चोरीसाठी तुमच्या खिशात हात घालेल, तेव्हा मोबाईल इतक्या प्रचंड वेगाने व्हायब्रेट होईल कि तो हातात पकडणे अवघड होणार आहे. लो फ्रिक्शन मोड मध्ये आल्याने या मोबाईलचा पृष्ठभाग चिकट बनेल व सतत वेगाने व्हायब्रेट झाल्याने तो हातात पकडता येणार नाही. यामुळे मोबाईल चोरीला अटकाव होऊ शकणार आहे. याची खास बात म्हणजे मोबाईल चोरी वाचविण्यासाठी बायोमेट्रिक, फिंगरप्रिंट, व ओळख पटविण्यासाठी ऑप्टीकल सेन्सर वापरले गेले आहेत. हे सेन्सर वेगवेगळ्या मोडवर काम करतात. लो फ्रिक्वेन्सी मोडच्या सहाय्याने हृदयाची धडकन ओळखून मोबाईल मालकाचा आहे का नाही हे कळणार आहे. फोन मालक वापरतोय का दुसरा कुणी हे हाय फ्रिक्वेन्सी मोड मध्ये कळू शकणार आहे.


जगभर मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून त्यावर नियंत्रण यावे म्हणून अॅपल ने त्यांच्या आयएसओ ७ ओएसने संचालित होणाऱ्या आयफोनमध्ये अॅक्टीवेशन लॉक सुविधा दिली आहे. यामुळे लंडन मध्ये आयफोन चोरीच्या घटनात २४ टक्के तर सॅन फ्रान्सिस्को मध्ये या घटनात ३८ टक्के घट झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका युके सह अन्य देशात दरवर्षी मोठ्या संख्येने मोबाईल चोरीच्या घटना घडतात.

Leave a Comment