सायना साकारण्यासाठी परिणीतीची होत आहे दमछाक


सध्या मैदानावर अभिनेत्री परिणीती चोप्रा घाम गाळत असून सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये ती तिची व्यक्तीरेखा साकारणार आहे. ती यासाठी बॅटमिंटनचे धडेही गिरवत आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर परिणीतीने एक फोटो शेअर केला आहे. ती यात बॅडमिंटन कोर्टात खेळताना दिसत आहे. येत्या ऑक्टोबरपासून या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार असल्याचे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.


खूप आधीपासून सायना नेहवालच्या बायोपिकवर काम सुरु होणार होते. श्रध्दा कपूरला यासाठी सर्वात आधी साईन करण्यात आले होते. पण तिला डेंग्यू झाल्यानंतर हा चित्रपट तिने सोडला. त्यानंतर तिच्या जागी परिणीतीची वर्णी लागली. आता परिणीती त्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शन करीत असलेला हा चित्रपट २०२० मध्ये रिलीज होणार आहे.

Leave a Comment