अमित शहांच्या त्या वक्तव्यामुळे पाक लष्कर प्रवक्त्याचा तीळपापड


इस्लामाबाद: पाकिस्तानी सैन्याच्या मिडिया विंग इंटर सर्विसेज पब्लिक रिलेशन्सचे (आयएसपीआर) महानिदेशक असिफ गफूर यांनी सामना आणि स्ट्राइकची तुलना न करण्याची विनंती केली आहे. 16 जून रोजी विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यात भारताच्या विजयानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संघाचे विजयाबद्दल अभिनंदन केले होते.

अमित शहा यांनी ट्विट करून टीम इंडियाचा अजून एक स्ट्राइक आहे आणि पाकिस्तानचा परिणामही एकसारखा असल्याचे म्हटले होते.

यावर आसिफ गफूर यांनी विनंती केली की क्रिकेटमध्ये भारताकडून पाकिस्तानचा झालेला पराभव आणि सीमेरेषेवर होत असलेल्या कारवायांची तुलना करु नये. विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर शहा यांनी भारतीय संघाला दिलेल्या अभिनंदन संदेशानंतर मेजर जनरल गफूर यांचे हे विधान आले आहे.

रविवारी ट्विट करून अमित शहा यांनी टीम इंडियाद्वारा पाकिस्तानावर आणखी एक स्ट्राईक आणि त्याचा परिणाम देखील समान आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन, प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे आणि या प्रभावशाली विजयावर अवघा देश जल्लोष साजरा करत आहे.

गफूरने आपल्या वैयक्तिक ट्विटर खात्याद्वारे शहांना उत्तर दिले आहे. प्रिय अमित शाह, होय, आपल्या संघाने एक सामना जिंकला. (ते) चांगले खेळले. त्याप्रमाणे दोन वेगळ्या गोष्टींची तुलना करता येत नाही. स्ट्राइक आणि सामन्याची तुलना करता येत नाही.

बालाकोटमध्ये 26 फेब्रुवारी रोजी भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्याच्या पाकिस्तानने दिलेल्या उत्तराचा संदर्भ देऊन ‘स्टे सप्राइज्ड’ असे गफूर म्हणाले.

Leave a Comment