पाकच्या पराभवाचा बदला घेणार आमिर खान


नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा भारताने ८९ धावांनी दारूण पराभव केल्यानंतर पाकिस्तीनी वंशाचा ब्रिटीश बॉक्सर आमिर खान याने या पराभवाचा बदला घेणार असल्याचे निर्धार केला आहे. त्याचबरोबर तो पाकिस्तानी संघाला फिटनेससाठी मदत करायला तयार असल्याचेही म्हणाला आहे.

पाकिस्तानच्या संघावर ‘फादर्स डे’ला मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या सामन्यातील पराभवानंतर चोहीबाजूने टीका होत आहे. फिटनेस, नेतृत्व, संघनिवड आणि कामगिरीवर टीका केली जात आहे. त्यातच बॉक्सर आमिर खान याने भारताविरोधातील पराभवाचा वचपा काढणार असल्याचे ट्विटरद्वारे म्हटले आहे.


मॅन्टेस्टरमध्ये पाकिस्तानी वंशाचा असलेल्या आमिर खान वाढला असून तो पेशेवर सर्किटमध्ये विश्वविजेता आहे. भारताचा बॉक्सर नीरज गोयतसोबत त्याचा पुढील सामना होणार आहे. या सामन्यात क्रिकेटमध्ये झालेल्या मानहाणीकारक पराभवचा बदला घेणार आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये भारताविरोधात विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव झाला. या पराभवचा बदला मी घेणार आहे. साऊदी अरबमध्ये १२ जुलै रोजी होणाऱ्या सामन्यात भारताच्या नीरज गोयतचा पराभव करणार आहे.


भारताचा बॉक्सर नीरज गोयत यानेही बॉक्सर आमिर खानला ट्विट करत जोरदार पंच मारला आहे. डब्ल्यूबीसी आशियाचा विजेता नीरज गोयतने आपल्या ट्विटमध्ये स्वप्न पाहत राहा आमिर खान, तू माझ्या सोबत भारताचा विजय पाहशील.

Leave a Comment