अब्जाधीशांच्या यादीतून अनिल अंबानींचे नाव गायब


नवी दिल्ली – अब्जाधीशांच्या यादीतून रिलायन्स कम्युनिकेशन्सचे चेअरमन अनिल अंबानी यांचे नाव गायब झाले आहे. सन 2008 मध्ये, अनिल अंबानी यांना जगातील 6 व्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती घोषित करण्यात आले होते.बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, 2008 मध्ये अनिल अंबानी यांच्याकडे 42 अब्ज डॉलर्सची मालमत्ता होती, 11वर्षांनंतर 2019 मध्ये ज्यात घट होऊन सुमारे 3651 कोटी रुपये झाली आहे. या मालमत्तेमध्ये तारण समभागांची किंमत देखील समाविष्ट आहे.

चार महिन्यांपूर्वी रिलायन्स ग्रुपची मालमत्ता 8,000 कोटींची होती. मार्च 2018 मध्ये रिलायन्स ग्रुपचे एकूण कर्ज 1.7 लाख कोटी रुपये होते. गेल्या आठवड्यात अनिल अंबानी यांनी सांगितले होते की गेल्या 14 महिन्यांत त्यांच्या समूहाने 35 हजार कोटी रुपयांची देनी देण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त, कंपनी नियमितपणे त्यांची देने देत राहिल. गुंतवणूकदारांना भरवसा देताना अनिल म्हणाले की एका वर्षात कंपनीने 24,800 कोटींचे आणि 10,600 कोटी रुपयांचे व्याज परत केले आहे.

सध्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सवर 47,234 कोटी रुपयांचे कर्ज आहे. रिलायन्स कॅपिटलवर 46,400 कोटी रुपयांचे कर्ज आहे. रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर अनुक्रमे 13,120 आणि 23,144 कोटी रुपयांचे कर्ज आहे. रिलायन्स पॉवरवर 31,697 कोटी रुपयांचा कर्जाचा बोझा आहे. अंबानी यांच्या रिलायन्स नेवल आणि इंजिनीअरिंगवर 10,689 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

11 जूनपर्यंत रिलायन्स ग्रुपचे बाजार भांडवल 7,539 कोटी रुपये होते. रिलायन्स कॅपिटलमध्ये अनिल अंबानींच्या कंपन्यांचे सर्वात मोठे बाजार भांडवल आहे, जे 2,373 कोटी रुपये आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स पॉवरचे बाजार भांडवल अनुक्रमे 462 आणि 1,669 कोटी रुपये होते. 11 जूनपर्यंत रिलायन्स नेवल आणि इंजिनियरिंगबद्दल बोलायचे झाले तर कंपनीचे बाजार भांडवल 467 कोटी रुपये होते. रिलायन्स होम फायनान्सचे भांडवल 860 कोटी, तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे बाजार भांडवल 1708 कोटी रुपये आहे.

Leave a Comment