प्रत्येक तासाला १४०/- रुपये कमावण्याची संधी देत आहे अॅमेझॉन


नवी दिल्ली – अॅमेझॉन फ्लेक्स ही योजना अॅमेझॉन इंडियाने जाहीर केली असून तुम्ही या योजनेअंतर्गत पार्ट-टाईम डिलीव्हरीद्वारे प्रत्येक तासाला १४०/- रुपये कमावू शकता.

याबद्दल माहिती देताना अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष अखिल सक्सेना यांनी सांगितले, की आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देताना आनंद होत आहे. आम्ही देशभरात वस्तूंची डिलिव्हरी जलद करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही अॅमेझॉन फ्लेक्सद्वारे क्षमता वाढवण्यावर भर देत आहोत. हजारांवर लोकांना या योजनेद्वारे फायदा होणार आहे. आता स्वत:च लोक स्वत:चे मालक असणार आहेत. त्यांनी वेळ भेटेल त्यावेळी वेळापत्रक बनवून अॅमेझॉन टेक्नॉलॉजीचा वापर करत वस्तूंची डिलिव्हरी करायची आहे.

यामध्ये ज्या लोकांकडे मोटारसायकल किंवा चारचाकी आहे अशांनाच भाग घेता येणार आहे. बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली येथे अॅमेझॉन फ्लेक्स ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना आगामी काळात इतर शहरात चालू होणार आहे. अॅमेझॉन फ्लेक्स योजनेत सहभागी होणाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थी वस्तूंच्या डिलिव्हरींचे प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर, त्यांना प्रत्यक्षात वस्तूंची डिलिव्हरी करता येणार आहे.

अॅमेझॉन फ्लेक्स योजनेत सहभागी होण्यासाठी अॅन्ड्रॉईड मोबाईलवर प्ले स्टोअरवरुन अॅमेझॉन फ्लेक्स अॅप डॉउनलोड करावे लागले. त्यानंतर साइन-अप करुन तुमच्याजवळ असलेल्या वाहनाची माहिती द्यावी लागेल.

Leave a Comment