बिना मेकअप सेल्फी- सेलेब्रिटींचा हॉट ट्रेंड


फिल्मस्टार्स ही एक वेगळीच जमात आहे कारण त्यांच्यावर नेहमीच परफेक्ट दिसण्याचा दबाव असतो. सिनेस्टार वयाने कितीही वाढला तरी त्याला सर्वसामान्य माणसाप्रमाणे म्हातारे दिसण्याचे स्वातंत्र नाही. नव्या पिढीतील फिल्मस्टार ही लक्ष्मण रेषा ओलांडून जाताना दिसत आहेत. हॉलीवूड मधील अनेक सेलेब्रिटी कलाकार नेहमी सुंदर आणि परफेक्ट दिसण्याचा दबाव झुगारून देऊन बिना मेकअप फोटो प्रसिद्ध करत आहेत त्यात बिना मेकअप सेल्फीचा सध्या हॉट ट्रेंड बनला आहे. हॉलीवूड मध्ये जे घडते ते बॉलीवूड मध्येही घडते या न्यायाने अनेक बॉलीवूड तारका त्यांचे बिना मेकअप सेल्फी शेअर करू लागले आहेत.


याची चर्चा सुरु झाली ती बेबो म्हणजे करीना कपूरने सुटीवर गेली असताना तिचा बिना मेकअप सेल्फी शेअर केला तेव्हापासून. अर्थात करीनाला या फोटोवरून खूप ट्रोल केले गेले. ती म्हातारी दिसू लागल्याच्या कॉमेंट आल्या पण करीनाने त्याकडे अजिबात लक्ष दिलेले नाही. हॉलीवूड मधील अनेक तारकांनी त्यांचे बिना मेकअप सेल्फी सोशल मिडियावर शेअर केले त्यात त्यांचे स्ट्रेच मार्क, तोंडावरील मुरुमे, पुटकुळ्या, डोळ्याखालची काळी वर्तुळे, तसेच चेहऱ्यावरचे नको असलेले केस स्पष्ट दिसत आहेत. मात्र हा परफेक्ट दिसण्याची जबरदस्ती, त्यासाठी येत असलेले प्रेशर आणि अनेक सामाजिक भिंती तोडण्याचा एक प्रकार म्हणून त्याकडे पहिले जात आहे.


करीनाचे नो मेकअप सेल्फी चर्चेत आले आहेतच मात्र त्यापूर्वीच सोनम कपूर, कृती सेनन, आलीया भट, दीपिका यांनीही त्यांचे नो मेकप सेल्फी शेअर केले आहेत. करीना नंतर मलाईका अरोराने तिचे नो मेकअप सेल्फी शेअर केले आहेत. त्यामुळे नो मेकअप सेल्फी आता ट्रेंड बनला आहे. करीनाच्या नो मेकअप सेल्फीमुळे तिला ट्रोल व्हावे लागले असले तरी अनेकांनी तिचा हा सेल्फी अॅप्रीशीएट केला आहे आणि अनेक जणांना मेकअप थापलेल्या चेहऱ्यापेक्षा या सेलेब्रिटीजचा ओरिजिनल लुक जादा पसंत पडतो आहे असेही दिसून येत आहे.

Leave a Comment