या दिवशी रिलीज होणार विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंह’


बॉलिवूडमध्ये सध्याच्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरु असून आत्तापर्यंत राजकीय व्यक्तींपासून ते खेळाडूपर्यंत बरेचसे बायोपिक तुमच्या भेटीला आले आणि प्रेक्षकांनीही या बायोपिकला चांगला प्रतिसाद दिला. त्यातच आता ‘सरदार उधम सिंह’ या बायोपिकमध्ये अभिनेता विकी कौशलही झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

हा बायोपिक जालियनवाला बाग हत्याकांडाचा सुत्रधार जनरल डायर याची हत्या करणाऱ्या ‘सरदार उधम सिंह’ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिका साकारत आहे. याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, २ ऑक्टोंबर म्हणजे गांधी जयंतीला ‘उधम सिंह’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक सुजित सरकार हे करत आहेत. या चित्रपटातील विकीचा लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. या चित्रपटाचा काही भाग लंडन येथे शूट करण्यात आला आहे. तर, लवकरच पुढील शूटिंग पूर्ण होणार असल्याची माहिती सुजित यांनी दिली आहे.

या चित्रपटानंतर ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन सुजित सरकार हे करणार आहे. आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन या चित्रपटात झळकणार आहेत. तर, विकी कौशल हा करण जोहर आणि शशांक खेतानच्या हॉरर ‘भूत’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्यामुळे विकी कौशलच्या दोन वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

Leave a Comment