राजस्थानातील हे शिवलिंग दिवसातून चक्क तीन वेळा रंग बदलते


आपल्या देशात खूप प्राचीन मंदिरे आहेत. त्यात प्राचीन मूर्त्यादेखील आहेत. ज्याबाबत अनेकांना माहिती देखील आहे. पण त्यातीलच अशी काही प्राचीन मंदिरातील मूर्त्या आहेत, ज्यांच्याबाबत आश्चर्यकारक गोष्टी आपल्या ऐकण्यात येतात. त्यातीलच एका मंदिराबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे वाचल्यानंतर तुम्ही खरच आश्चर्यचकित व्हाल. राजस्थानमधील ‘अचलेश्‍वर महादेव’च्या या मंदिरामध्ये असलेले शिवलिंग आपले रंग बदलते. त्यामुळे याठिकाणी फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातून अनेक लोक दर्शनासाठी येत असतात.

अनेक तज्ज्ञ राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या ‘अचलेश्‍वर महादेव’ मंदिराबाबत सांगतात की, दिवसातून तीनवेळा हे शिवलिंग रंग बदलते. हे शिवलिंग सकाळच्या वेळी लाल रंगाचे दिसते. तर दुपारच्या वेळी केशरी रंगाचे आणि रात्री काळ्या रंगाचे दिसते.

याबाबत स्थानिक लोक सांगतात की, अनेकदा मंदिराच्या आजूबाजूला शिवलिंगाच्या रंग बदलण्याच्या गोष्टीमागील कारण शोधण्यासाठी खोदकाम करण्यात आले. परंतु शिवलिंगाचा ठाव खोलवर खोदकाम करूनही सापडलाच नाही. शेवटी भगवान शंकराची कृपा समजून हैराण झालेल्या लोकांनी खोदकाम बंद केले.

अनेक प्रयत्न ‘अचलेश्‍वर महादेव’ मंदिरातील शिवलिंगाच्या रंग बदलण्यामागील खरं कारण शोधण्यासाठी केले गेले पण ते सर्व व्यर्थ गेले. पुरातत्व विभागानेही यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांच्या पदरीही अपयशच आले. पण जेव्हा त्या लोकांच्या काहीच हाती लागले नाही त्यावेळी त्यांनी सर्व प्रयत्न बंद करून हा दैवी चमत्कार असल्याचे अखेर मान्य केले.