यामुळे रंगबिरंगी कपडे घालतो रणवीर सिंह


आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे अभिनेता रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतो. अनेक शो आणि कार्यक्रमात रणवीर रंगबिरंगी किंवा थोड्या हटके स्टाईलचे कपडे घालतो. रणवीर सिंहला आपल्या या स्टाईलमुळे बऱ्याचदा सोशल मीडियावरही ट्रोल करण्यात आले आहे. पण अशा प्रकारचे फॅशन आणि कपडे घालण्याच्या आयडिया कुठून येतात याबद्दल रणवीरने फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितले आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीर सिंहने फादर डेच्या निमित्ताने वडील जगजीत सिंह भवनानी यांचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. रणवीर सिंहचे वडील फोटोमध्ये सिल्व्हर मॅटेलिक जॅकटमध्ये दिसत आहेत. रणवीर सिंह यांच्या वडिलांचा फोटो पाहून समजू शकते की रणवीरला फॅशनच्या आयडिया आपल्या वडिलांकडून मिळतात. well, now you Know …. #hypebeast #happyfathersday #iloveyoupapa.’ असे कॅप्शन रणवीरने आपल्या वडिलांच्या फोटोला दिले आहे.

सध्या 83 चित्रपटांच्या शूटिंगमध्ये रणवीर सिंह व्यस्त आहे. 1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारताने ऐतिहासिक विजयावर आधारीत हा चित्रपट आहे. कपिल देव यांच्या भूमिकेत रणवीर सिंह यामध्ये दिसणार आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणही या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीर आणि दीपिका लग्नानंतर पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी दीपवीरचे चाहतेही उत्सुक आहेत.

Leave a Comment