आता सुहानानंतर आर्यन खानचे ‘या’ चित्रपटातून पदार्पण?


अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक बड्या कलाकारांच्या मुलांनी गेल्या 2 वर्षात वेगवेगळ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. जान्हवी कपूर, अनन्या पांडे आणि सारा अली खान यांची नावे यामध्ये पहिली घेतली जातात. आता बॉलिवूडमध्ये शाहरुख खानचा मुलगा पदार्पण करणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या दिसत आहे. आर्यनची मोठ्या संख्येने सोशल मीडियावरही फॅन फॉलोविंग आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शाहरुखने शेअर केली आहे. या पोस्टनुसार आपले वडील शाहरुखसोबत आर्यन चित्रपटात पदार्पण करणार असल्याचे समजत आहे. ‘द लायन किंग’ या चित्रपटाचे नाव आहे. पोस्टनुसार शाहरुख आणि आर्यन काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका रेकॉर्डिंग स्टुडिओ बाहेर एकत्र दिसले. दरम्यान स्टुडिओमध्ये शाहरुख खानची पत्नी गौरीही एकदा डबिंग सेशनसाठी आली होती.


हॉलिवूडपट ‘द लायन किंग’ चित्रपटासाठी शाहरुख आणि आर्यन डबिंग करत आहेत. पण यावृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. इन्स्टाग्रामवर शाहरुखने आपल्या मुलासोबत फोटो पोस्ट केला आहे. दोघांनी ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे टीशर्ट घातले आहे. शाहरुखच्या टी-शर्टवर मुसाफा (लायन किंगचे नाव) आणि आर्यनच्या टी-शर्टवर सिंबा (छोठा लायन) लिहिले आहे.

Leave a Comment