जगातला शेवटचा रस्ता ई ६९

north
माणसाने आयुष्यात एकदा तरी आपल्या पृथ्वीच्या उत्तरध्रुवाला भेट देण्याचे स्वप्न पाहायला हवे कारण पृथ्वीवरचे हे सर्वात सुंदर ठिकाण आहे आणि जगातील शेवटचा रस्ता येथेच आहे. हा भाग युरोपला जवळचा आहे. नॉर्वे देशाचे हे शेवटचे टोक. या रस्त्याला ई ६९ असे नाव असून येथे प्रचंड थंडी आहे तरीही लोकवस्ती आहे.

pole
इ ६९ रस्ता जेथे संपतो त्याच्यापुढे केवळ बर्फ आणि बर्फ आहे आणि समुद्र आहे. आर्क्टिक सागर असे या समुद्राचे नाव. इ ६९ रस्त्यावर एकट्याने कारने जाण्यास अनेक भागात बंदी आहे. केवळ १४ किमी लांबीचा हा रस्ता असला तरी येथे कुणीही हरवून जाईल अशी अनेक ठिकाणे आहेत.

arktik
१९३० मध्ये या भागाचा विकास झाला. त्यापूर्वी येथे मासे व्यवसाय केला जात असे. १९३४ साली येथील लोकांनी हा रस्ता पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला त्यामागे अर्थप्राप्ती वाढेल असा हेतू होता. येथे थंडीत पूर्ण अंधार असतो तर उन्हाळ्यात सूर्य मावळत नाही. येथील लोकांना आजही बाकी जगापासून वेगळे राहणे मानवते तसेच त्यांना मोठी शहरे आवडत नाहीत. या जागेत मच्छीमारांमुळे खूप बदल झाले आहेत. या ठिकाणी किंग खेकडे पकडले जातात. वर्षाखेरी येथे दिसणारे नॉर्थन लाईट्स पाहायला जगभरातून पर्यटक येत असतात.

Leave a Comment