शक्तिशाली डीजीएक्स २ सुपरकॉम्पुटर भारतात


आर्टीफीशीअल इंटेलिजन्स मध्ये जगात सर्वाधिक शक्तिशाली असलेला डीजीएक्स २ सुपरकॉम्पुटर भारतात जोधपुर आयआयटी मध्ये दाखल झाला असून त्यामुळे देशात आर्टीफीशीअल इंटेलिजन्स प्रशिक्षणाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जोधपुर आयआयती कॉम्पुटर विभाग अध्यक्ष डॉ. गौरव हरित या संदर्भात म्हणाले जगातील सर्वाधिक वेगवान मध्ये या कॉम्पुटरचा समावेश असून भारतात तो प्रथमच आणला गेला आहे. विशेष प्रयोगशाळेत तो बसविला गेला असून त्याची किंमत आहे अडीच कोटी रुपये.

या सुपरकॉम्पुटरची क्षमता प्रचंड आहे. त्याला १६ विशेष जीपीयु कार्ड्स आहेत व त्या प्रत्येकाची क्षमता ३२ जीबी आहे आणि रॅम ५१६ जीबी आहे. सर्वसामान्य संगणकाची क्षमता १५० ते २०० वॉट असते या संगणकाची क्षमता १० किलोवॉट आहे. त्याचे वजन १५० किलो आहे.

प्रत्येक संगणकात प्रोग्राम डेटा विश्लेशणावर आधारित असतो. हा संगणक हे विश्लेषण फारच वेगाने करतो. देशात सध्या आयआयएससी बंगलोर सह अन्य संस्थात डीजीएक्स १ सुपर कॉम्पुटर आहेत. त्याच्या क्षमतेपेक्षा या कॉम्पुटरचा वेग दुप्पट असून जे काम हे संगणक १५ दिवसात करतात तेच काम हा संगणक दीड दिवसात करतो. त्याचे इंटरनल स्टोरेज ३० टीबी असून अमेरिकन कंपनी NVIDIA आणि जोधपुर आयआयटीने आर्टीफीशीअल इंटेलिजन्स क्षेत्रात सहकार्यासाठी दोन वर्षाचा करार केला असल्याचे समजते. त्याअंतर्गत हा सुपर कॉम्पुटर भारतात आणला गेला आहे.

Leave a Comment