ब्रिटीश रॉयल फॅमिलीची या शब्दांना अधिक पसंती


जगात जेथे जेथे राजघराणी आहेत त्या सर्वात अधिक चर्चा होत असते ती ब्रिटीश राजघराण्याची. ब्रिटीश लोकांना आणि जगभरातील अनेक नागरिकांना या घराण्यातील व्यक्ती, त्यांचे राहणीमान, त्यांचे खाणे पिणे या विषयी जाणून घेणे आवडते. त्यांचे एटिकेट्स, बोलणे, वागणे काही खास पद्धतीने होत असते. त्याबाबत हे राजे राण्या अतिशय काटेखोर असतात. सोशल अँन्थ्रोपोलॉजिस्ट केट फॉक्स यांनी राजघराण्यातील व्यक्ती कोणते शब्द वापरण्यास प्राधान्य देतात याची मजेशीर माहिती दिली आहे.

आईवडील यांना हाक मारताना अथवा त्यांच्या उल्लेख करताना विविध भाषात अनेक शब्द आहेत आणि इंग्लिश भाषेत डॅडी आणि ममी हे शब्द अधिक रूढ आहेत. त्याचा उच्चार मॉम डॅड असा सर्रास केला जातो मात्र ब्रिटीश राजघराण्यातील व्यक्ती असा अपभ्रंश कधीच करणार नाहीत. हे लोक वयाने कितीही मोठे झाले तरी आईवडीलांचा उल्लेख ममी आणि डॅडी असाच करतात.


वागण्यात आपल्या हातून एखादी चूक झाली, कुणी बोलत असताना आपल्याला ऐकू आले नाही तर साधारणपणे पार्डन शब्द वापरला जातो. ब्रिटीश शाही कुटुंब हे मॅनर्स पाळते पण पार्डन ऐवजी सॉरी हा शब्द त्यांना अधिक पसंत आहे. पार्डन हा शब्द ते योग्य मानत नाहीत. आपण बरेचवेळा किंवा दररोज सुद्धा परफ्युमचा वापर करतो. शाही कुटुंबाला हि परफ्युम आवडतो मात्र त्याचा उल्लेख किंवा उच्चार ते सेंट या शब्दाने करतात.


युके मध्ये चहा हे केवळ पेय नाही. सायंकाळी ५ ते ७ या वेळात खाल्ल्या जाणाऱ्या स्नॅक्सनासुद्धा टी म्हटले जाते, ब्रिटीश राजघराणे किंवा ब्रिटीश हाय क्लास समाजात हा शब्द वापरला जात नाही. त्यासाठी डिनर हाच शब्द वापरला जातो. खाद्यपदार्थ खाताना एखाद्या छोट्या भागाला आपण पोर्शन म्हणतो तर शाही कुटुंब त्याचा उल्लेख हेल्पिंग साईज असा करते. इतकेच काय घरातील मेन फ्रंट रूमला जगभर लाउंज म्हटले जाते मात्र ब्रिटीश रॉयल फॅमिली त्याला सिटींग रूम किंवा ड्रॉइंग रूम असेच म्हणते. विशेष म्हणजे आपली रोजची गरज असलेल्या टॉयलेट या शब्दाचा वापर करणे राजकुटुंब लो क्लास मानते. ते टॉयलेट हा शब्द वापरण्याऐवजी लु किंवा लॅव्हेटरी हा शब्द वापरण्यास प्राधान्य देतात.

Leave a Comment