या पठ्ठ्याने सायकलने पार केला 54 हजार किलोमीटरचा प्रवास


तायपे – आपल्या अनोख्या प्रवासाला तायवानमध्ये राहणाऱ्या एका ध्येयवेड्या तरूणाने सुरूवात केली आहे. जॅकी चॅन असे या 40 वर्षीय तरूणाचे नाव असून चार वर्षापूर्वी त्यानी आपल्या नोकरीला रामराम ठोकला आणि जगभ्रमंतीसाठी सायकल घेऊन निघाला. त्याने आतापर्यंत 54 हजार कि.मी.चा प्रवास पूर्ण करून 64 देशाला भेट दिली आहे. जॅकी सध्या इस्रायलच्या येरूशलममध्ये आहेत.

अमेरिका, यूरोप आणि मध्य पुर्व देशांमध्ये जॅकी फिरून आला आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये मुक्कामासाठी न जाता तो स्वतःच राहण्यासाठी टेंट लावतो. जॅकी आराम करताना मिळालेल्या वेळेत काउचसर्चिंग अॅपद्वारे पुढे जाण्याचा मार्ग आणि देशांविषयी माहिती गोळा करतो. जॅकीनुसार, त्याने हा रोमांहर्षक प्रवास करताना आतापर्यंत 64 देशांना भेटी दिल्या आहेत. त्यामुळे जॅकीला आता 100 देश फिरण्याचे लक्ष पूर्ण करायचे आहे. पण त्याला यासाठी एकूण एक लाख कि.मी.चा प्रवास करावा लागत असल्यामुळे आणखी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. तसेच, जॅकीने सांगितले की, ते कोणत्याही देशात जाण्यापूर्वी अधिक माहिती घेत नाहीत.

जॅकी येरुशलमविषयी म्हणाले की, माणसाला हे शहर आश्चर्यचकित करते. ईसाई, मुस्लिम आणि यहूदी धर्माचे लोक याठिकाणी राहत असल्यामुळे आपल्याला इजराइल आणि फिलिस्तीनी यांच्यात संघर्षसुद्धा पाहायला मिळतो. तसेच, 9 लाख लोकसंख्या असणाऱ्या या शहरात आपल्याला प्राचीन आणि आधुनिक गोष्टी पाहायला मिळतील.

जॅकी दिलेल्या माहितीनुसार, त्याला सर्वात मोठी अडचण बर्फाळ प्रदेशात आली. जेव्हा प्रवासादरम्यान वेगाने धावणाऱ्या गाड्या त्याच्या जवळून गेल्या तेव्हा तो मरता मरता वाचला आहेत. आपल्या प्रवासाची सुरूवात जॅकी यांनी अमेरिकेतील अलास्कापासून केली. यामध्ये त्याने दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये असलेल्या 25 हजार मीटर ऊंच इंका सभ्यतेचे अवशेष माचू पिच्चूचे दर्शन घेतले. जॅकी येरूशलमनंतर आता जॉर्डनहून मिस्त्र आणि अफ्रिकेच्या इतर देशात जाणार आहेत. तसेच, स्वतःची ओळख निर्माण व्हावी म्हणून त्यांनी आपल्या टि-शर्टवर ”मैं जॅकी हू, तायवान से आया हू” असे घोषवाक्य लिहिले आहे.

स्कॉटलंडच्या मार्क बूमॉन्ट यांनी 2017 साली 79 दिवसामध्ये विश्वभ्रमंती करून विश्वविक्रम केला होता. जॅकी यावर म्हणतात की, हा प्रवास त्यांनी स्पर्धेसाठी केला नसून आनंद घेण्यासाठी केला आहे.

Leave a Comment