आपल्या स्टाईलसोबतच ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा आपल्या बिनधास्त अंदाजासाठीदेखील ओळखली जाते. नुकतेच तिने आपल्या बिनधास्त आयुष्य जगण्यामागचे रहस्य एका व्हिडिओच्या माध्यमातून उलगडले आहे.
प्रियंकाने उलगडले बिनधास्त आयुष्य जगण्याचे रहस्य
सोशल मीडियावर प्रियंकाने शेअर केलेल्या व्हिडिओतून आपल्या चाहत्यांना बिनधास्त जीवन जगण्याचे ५ धडे दिले आहेत. तिने हे धडे अगदी मजेशीररित्या तिच्या खास अंदाजात मांडले आहेत. चाहत्यांनीही तिच्या या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अलिकडेच तिने आपल्या आगामी ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांची देखील या चित्रपटात भूमिका राहणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.