शुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पांड्याकडून खिचाई


मुंबई : अंडर 19 क्रिकेट विश्वचषकात चमकदार कामगिरी करुन युवा क्रिकेटपटू शुभमन गिलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतंरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर शुभमनची वर्णी टीम इंडियामध्ये लागलेली नसली, तरी निवड समितीची त्याच्यावर नजर असल्याचे म्हटले जाते. त्याच शुभमन गिलने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला, त्यावर चक्क मास्टर ब्लास्टरच्या लेकीने कमेंट केली आणि त्यानंतर शुभमनची खिचाई सुरु झाली.

शुभमनने 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात 372 धावा ठोकल्या होत्या. यात उपात्य फेरीत पाकिस्तानविरोधात झळकवलेल्या शतकाचाही समावेश आहे. शुभमनने मालिकावीराचा किताब जिंकल्यानंतर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडरमध्ये स्थान मिळवले. त्याने 14 सामन्यांमध्ये 296 धावा ठोकल्या. आपल्या कमाल कामगिरीनंतर ‘ये तौफा हमने खुद को दिया है’ स्टाईलमध्ये स्वतःला शानदार रेंज रोवर कार गिफ्ट केली.

आपल्या शानदार गाडीचा फोटो शुभमनने इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यावर ‘थाले मेरे रंगे अंख बाज नालो तेज’ असे पंजाबी कॅप्शनही दिली. चाहत्यांनी त्यावर धडाधड शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरची देखील एक वेगळी कमेंट होती. साराने आपल्या कमेंटमध्ये शुभमनचे अभिनंदन केले आहे.


शुभमनने साराच्या मेसेजला ‘थँक यू’ असा रिप्लाय केला. त्याचबरोबर त्यापुढे ‘पिंक हार्ट’ची इमोजीही टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण त्यावर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने न राहवून रिप्लायही केला. पांड्याने साराच्या वतीने वेलकम बॅक’ असे म्हणत शुभमनचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला. चाहत्यांनी त्यावर पांड्याच्या उत्स्फूर्तपणाला मनमोकळी दाद दिली आहे.

Leave a Comment