या लोकांनी करू नये रक्तदान


जगभरात नुकताच रक्तदाता दिवस साजरा केला गेला आहे. रक्तदान हे पुण्यकर्म मानले गेले आहे कारण त्यामुळे एखादा जीव वाचू शकतो. अर्थात रक्तदान कुणी करावे याला काही नियम आहेत आणि त्यासाठी खास कायदे केले गेले आहेत. ते मोडून जर कुणी रक्तदान करत असेल तर तो दुसऱ्याचा जीव धोक्यात घालत असतो. त्यामुळे रक्तदान कुणी करावे आणि कुणी करू नये याची महिती प्रत्येकाला असली पाहिजे.

ज्या प्रमाणे मतदान करण्यासाठी १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे रक्तदान करण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण असावी लागतात. यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने रक्तदान केले तर त्याच्या शरीरावर अनिष्ट परिणाम होण्याचा धोका असतो आणि त्याचे शरीर कमजोर होऊ शकते. त्याची विकास क्षमता प्रभावित होण्याची शक्यता असते. ड्रग टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डच्या नियमानुसार पुरुषांनी एकदा रक्तदान केले असेल तर किमान ९० दिवस पुन्हा रक्तदान करता येत नाही. कारण नवीन रक्त तयार होण्यास तेवढा कालावधी लागतो. त्यामुळे लगेच रक्त दिले तर रक्तक्षय होण्याची भीती असते.


रक्त देताना त्यातील हिमोग्लोबिनचे प्रमाण किमान १२.५ असणे आवश्यक आहे. हे प्रमाण त्यापेक्षा कमी असेल तर ते रक्त रुग्णासाठी फायदेशीर ठरत नाही. तृतीयपंथी, समलैगिक यांनी डॉक्टरांनी तपासल्याशिवाय रक्तदान करू नये. या लोकांचे रक्त अशुद्ध असण्याची शक्यता असते आणि त्याच्यातील नकारात्मक घटकांचा परिणाम ज्याला रक्त चढवायचे आहेत त्याच्यावर होऊ शकतो.

ज्यांचा पल्सरेट ६० ते १००च्या दरम्यान आहे, ते लोक रक्तदान करू शकतात. यापेक्षा कमी रेट असलेल्यांनी रक्तदान केले तर त्यांना हार्टअॅटॅक येण्याचा धोका असतो. नुकतीच प्रसूती झालेल्या महिलांनी किमान १ वर्ष रक्तदान करू नये. प्रसूतीमुळे त्यांचे शरीर कमजोर झालेले असते त्यात रक्तदान केले तर रक्तदाब वाढू शकतो. इन्शुलीन घेणारे अथवा रक्ताचा कोणताही विकार असणारे रक्तदान करू शकत नाहीत. कारण त्यामुळे रुग्णास इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो आणि कधी जीव जाऊ शकतो.

एचआयव्ही बाधित लोक, दम्याचे रुग्ण यांना रक्तदान करता येत नाही. तसेच घरातील कुणाही व्यक्तीला मलेरियाची लागण झाली असेल तर त्या घरातील बाकी व्यक्ती किमान ३ महिने रक्तदान करू शकत नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment