हलाल नाईटक्लब चौकशीच्या फेऱ्यात अडकला


सौदी अरेबिया या कर्मठ देशात राजधानी जेद्दा येथे गुरुवारी सुरु होणारा हलाल नाईट क्लब चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचे वृत्त आहे. जेद्दाच्या किनारी भागात आणि पवित्र मक्का मादिनेपासून जवळ हा नाईटक्लब सुरु होत असल्याचे दुबई आणि बैरुत येथील नाईट क्लब ब्रांड व्हाईट तर्फे जाहीर केले गेले होते आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमात अमेरिकन सिंगर ने यो गाणार होता. या कार्यक्रमाची जाहिरात क्लबने फेसबुकवर केली होती आणि त्यासाठी ५०० ते १००० रियाल तिकीट दर होता. मात्र जेद्दा मध्ये नाईट क्लब सुरु होतोय यावर विरोधकांनी जोरदार आवाज उठविला होता आणि याचा विरोध केला होता.


त्यावर सौदीच्या जनरल एन्टरतेनमेंट अॅथोरिटीने या क्लबला परवानगी दिली नसल्याचा खुलासा त्यांच्या अधिकृत ट्विटर अकौटवरून केला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे या क्लबने पूर्वी दिलेल्या परवान्याचा गैरवापर केला असून याची चौकशी सुरु आहे. मक्का मदिना जवळ नाईटक्लब उघडला जातोय याबाबत देशातून उपहास, आश्चर्य आणि राग व्यक्त करणाऱ्या शेकडो प्रतिक्रिया आल्या होत्या आणि मुल्ला मौलवीने फतवा काढून त्याचा विरोध केला होता.


व्हाईट क्लबचे सीइओ या संदर्भात घोषणा करताना म्हणाले होते, सौदीतील हा पहिला वाहिला नाईट क्लब असला तरी इस्लामी आहार नियमानुसार येथे दारू दिली जाणार नाही. आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी हे खास आकर्षण ठरेल. सौदीचे मार्केट हे जगातील उत्तम मार्केट आहे आणि येथे फिरणे लोकांना आवडते. म्हणून जेद्दा मध्ये आयरिश कॅफे सुरु झाला आहे. आमच्या क्लबचे वेळ रात्री १० ते पहाटे ३ अशी असून १८ वर्षाखालील मुलांना तेथे प्रवेश नाही. महिला पुरुषांना मात्र प्रवेश दिला जाणार आहे. येथे संगीताची मेजवानी भरपूर मिळेल आणि हा एक प्रकारच हाय एंड कॅफे लाउंज असेल.

Leave a Comment