बाजारात येतोय अमित शहा आंबा


लखनौच्या मलिहाबाद येथील प्रसिद्ध सेलेब्रिटी आंबा उत्पादक हाजी कलामुल्लाह यांनी यंदा विकसित केलेल्या आंब्याच्या नव्या जातीला केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या सन्मानार्थ शहा आंबा असे नाव दिले असून लवकरच हे आंबे बाजारात दाखल होत आहेत. हाजी कलामुल्लाह यांनी अमित शहा यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन आणि त्यांच्यात समाजातील सर्व लोकांना एकत्र करून एका मंचावर आणण्याची जी क्षमता आहे त्याचे कौतुक म्हणून या नव्या आंब्याला शहा यांचे नाव दिले आहे.


अमित शहा आंबा वजन आणि चव दोन्ही बाबतीत उत्तम प्रतीचा असून हा आंबा आता तोडणीस तयार आहे. लवकरच हे आंबे पिकतील असे हाजी यांचे म्हणणे आहे. हाजी गेली कित्येक वर्षे आंबाच्या नव्या जाती विकसित करत असून त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. २०१५ साली त्यांनी नव्याने विकसित केलेल्या आंब्याला नरेंद्र मोदी नाव दिले होते. हा आंबा मोदींना स्वतः देण्याची इच्छा व्यक्त केली होती. हाजी सांगतात हा आंबा मोदींसारखा दिसायला उत्तम आणि चवीला अतिशय गोड आहे. ज्या कुणी हा आंबा चाखला तो अधिकारी, फळ तज्ञ यांनी या आंब्याच्या स्वादाची तारीफ केल्याचे ते सांगतात. मलिहाबाद येथे त्यांच्या आमराया असून यापूर्वी त्यांनी एका जातीला ऐश्वर्या राय तर दुसर्या एका जातीला सचिन तेंडूलकर असे नाव दिले होते.

अमित शहा आंबा हा कोलकाताच्या हुस्न ए आरा आणि लखनौच्या फेमस दशेरा यांच्या संकरातून बनला आहे.

Leave a Comment