धोनीच्या चाहत्यांना हे हॉटेल देत आहे मोफत जेवण


संपूर्ण देशवासियांच्या गळ्यातला ताईत ‘कॅप्टन कूल’ नावाने ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी हा बनलेला आहे. धोनीचे अनेक चाहते आपल्याला भारताच्या प्रत्येक राज्यात भेटतील. धोनी देशासोबतच परदेशातही तितकाच लोकप्रिय आहे. धोनीचे चाहते कोणताही सामना असो आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी मैदानात गर्दी करतात. धोनीचा असाच एक पश्चिम बंगालमधील चाहता सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

धोनीच्या चाहत्यांना पश्चिम बंगालमधील अलिपूरदर जिल्ह्यातील ‘एमएस धोनी हॉटेल’ हे फुकटात जेवण देत असल्याची माहिती हॉटेलचे मालक शंभुनाथ बोस यांनी दिली. धोनीचे शंभुनाथ हे स्वतः चाहते आहेत. पारंपरिक बंगाली खाद्यपदार्थांसाठी शंभुनाथ बोस यांचे हॉटेल हे प्रसिद्ध आहे. शंभुनाथ बोस यांनी धोनीच्या पोस्टर्सने आपल्या छोटसे हॉटेल सजवले आहे.

माझ्या हॉटेलला या दुर्गापुजेच्या दिवशी दोन वर्ष पूर्ण होत आहेत. आता येथील लोकांना ही जागा चांगलीच परिचीत आहे. धोनी हॉटेलबद्दल येथे कोणालाही विचारले तर तुम्ही योग्य जागी येऊन पोहचाल. धोनीच्या खेळाचा मी चाहता आहे, त्याच्यासारखा खेळाडू मी पाहिलेला नाही. माझ्यासाठी त्याच्या अनेक खेळी या प्रेरणादायी आहेत. माझ्या हॉटेलमध्ये त्याने एकदा येऊन माझ्या हातचे पदार्थ खावेत अशी माझी इच्छा आहे. त्याला माशांचे कालवण आणि भात आवडतो असे मी ऐकले आहे, त्याने हे खाण्यासाठी कधीही माझ्या हॉटेलमध्ये यावे, असे बोस यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Leave a Comment