मुंबई सागामध्ये झळकणार दिग्गज स्टारकास्ट


एक तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात प्रामुख्याने अभिनेता जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी या दोघांनाही पहिल्यांदाच एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दोघेही लवकरच ‘गँगस्टर’च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांचा आगामी चित्रपट १९८०-९० च्या दशकातील चित्रपटाच्या गँगस्टर कथानकावर आधारित असणार आहे.


त्यांच्या आगामी चित्रपटाचे ‘मुंबई सागा’ असे नाव असून जॉन आणि इमरानसह जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोव्हर, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. संजय गुप्ता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, क्रिश्न कुमार, अनुराधा गुप्ता आणि संगीता अहिर हे करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची अधिकृत माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

पुढच्या वर्षी ‘मुंबई सागा’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या शूटिंगला जुलै महिन्यात सुरुवात होईल. संजय गुप्ता यांनी चित्रपटसृष्टीमध्ये २५ वर्षे पूर्ण केली आहेत.

Leave a Comment