सर्वात वेगळी आणि विचित्र फिगर बनवायची आहे या मॉडेलला

natasha-crown
विचित्र शौक जगभरात लोकांना असतात. झिरो फिगर कुणाला हवी असते तर आपले हिप्स वाढवण्यात कुणाला मजा येते. आम्ही तुम्हाला आज अशाच एका स्वीडिश मॉडेलविषयी सांगणार आहोत. तुम्ही तिची फिगर पाहून चकीत व्हाल आणि तिची इच्छा पाहून तर तुम्हाला वाटेल की, अखेर या मॉडेलला नेमके काय करायचे आहे. तुम्ही एका स्वीडिश मॉडलची फिगर पाहून हैराण व्हाल. या मॉडेलचे हिप्स खुप मोठे असून ही जगातील सर्वात मोठे हिप्स असणारी मॉडल आहे आणि आपले हिप्स अजून तिला वाढवायचे आहेत. नताशा क्राउन असे या स्वीडिश मॉडलचे नाव आहे.
natasha-crown1
हिप्स 80 इंचांचे 25 वर्षीय नताशा क्राउनचे आहेत, पण ते तिला अजून वाढवायचे आहेत. अनेक वेळा तिने सर्जरी करुन आपल्या हिप्सची साइज वेगळी केली आहे. आता डॉक्टर म्हणतात की, तिने जर हिप्स वाढवण्यासाठी सर्जरी केली तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि इन्फेक्शन होण्याचा धोकाही वाढेल.
natasha-crown2
5 फूट 10 इंच उंची असणारी नताशा मुळची सर्बिया येथे राहणारी असून ती सध्या स्टॉकहोममध्ये राहते. नताशाचे इंस्टाग्रामवर 3 लाख 18 हजार आणि फेसबुकवरही लाखो फॉलोअर्स आहेत. नताशाने एका अमेरिकी रियलिटी टीव्ही शोदरम्यान सांगितले की, माझे हिप्स चांगले आहेत, त्याची साइज मला कधीच कमी करायची नाही. माझे हिप्स थोडे वेगळे दिसतात. यामुळे लोक माझ्याकडे आकर्षित होतात.
natasha-crown3
नताशाने सांगितले की, माझ्या मोठ्या हिप्समुळे मी अनेक खुर्च्या मोडल्या आहेत. नताशा म्हणते की, मी नेहमी वेगळी राहिले आहे आणि स्वीडनमध्ये महिलांना वाटते की, सडपातळ असणे सुंदर असते. पण मला वाटते की, लोकांनी आपला दृष्टीकोण बदलावा. आतापर्यंत नताशाने तीनवेळा सर्जरी केली आहे आणि पुन्हा सर्जरी करण्याचा विचार करत आहे. कारण तिला तिचे हिप्स अजून वाढवायचे आहे. डॉक्टर म्हणतात की, नताशाला सर्जरीसाठी अजून चरबीची गरज आहे. नताशा म्हणते की, माझे सर्वात मोठे लक्ष्य म्हणजे जगातील सर्वात मोठे हिप्स बनवणे असून मला असे करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.

Leave a Comment