सोशल मीडियावरून वाढविली शेतकऱ्याने तिप्पट कमाई


गुजरातमधील 21व्या शतकातील एका शेतकऱ्याने सोशल मीडियाचा वापर करून आपले उत्पन तिपटीने वाढविले आहे. हा शेतकरी फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून पिके आणि भाज्या विकतो. इतकेच नाही तर त्याच्या शेतातील मालाची अॅडव्हान्स बुकिंग सोशल मीडियावरून होते.

सौराष्ट्रमधील जुनागढ जिल्ह्यातील रसिकभाई दोंगा हे अनेक वर्षांपासून शेती करत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून गहू, हरभरा, तीळ आणि आपल्या भाज्या साता समुद्रापार विकल्या आहेत. गव्हाचे पीक यायला अद्याप 10 महिने बाकी आहेत, मात्र त्यांनी आतापासूनच बुकिंग सुरू केली आहे. त्यासाठी 800 रुपये मण एवढा भाव मिळाला आहे, मात्र त्यासाठी त्यांनी अमेरिकन स्टँडर्ड प्रमाणपत्र मिळवावे लागले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ई-मार्केट व ई-लर्निंग या कल्पनांचा स्वीकार करून त्यांनी हे यश मिळविले आहे. आपले उत्पादन मंडईत किंवा दलालाला विकण्याऐवजी त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना विकण्याचा मार्ग पत्करला आहे.

कृषितज्ञ सुभाष पाळेकर यांच्या गाय आधारित झिरो बजेट शेतीचे तंत्र दोंगा यांनी स्वीकारले असून त्यातून ते सेंद्रिय भाज्या व शुद्ध गव्हाचे उत्पादन घेतता. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना नुकतेच गुजरात सरकारने सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचे पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.

Leave a Comment