यामुळे अमेरिकेतील 30 लाख मुले करु शकत नाही गृहपाठ


न्यूयॉर्क – दररोज रात्री शाळेने दिलेला गृहपाठ करणे हार्टफोर्टच्या एका शाळेत शिकणाऱ्या रिगन बायरिडसाठी आव्हान झाले आहे, कारण कॉम्प्युटर आणि इंटरनेट तिच्या घरात नसल्यामुळे पालकांच्या स्मार्टफोनचा वापर करून ती आपला गृहपाठ होमवर्क पूर्ण करते. पण स्मार्टफोन तिला रात्रीच मिळतो. ती लहान स्क्रीनवर वेब पेज उ‌लटत राहते. पण जेव्हा गृहपाठ जमा करण्याची वेळ येते तेव्हा खूप तिच्यासमोर खूप अडचणी येतात. त्यामुळे हातानेच तिला लिहून द्यावे लागते.

रिगन अशी एकटीच विद्यार्थिनी नसून अमेरिकेतील सुमारे ३० लाख शालेय विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करण्यासाठी असाच संघर्ष करत आहेत. अमेरिकेच्या द इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन सायन्सेसने केलेल्या सर्व्हेनुसार, १७% विद्यार्थ्यांच्या घरी पीसी नाही, तर १८% कडे इंटरनेटची सुविधा नाही. याबाबत अमेरिकेच्या शिक्षण विभागानुसार, शाळेत आणि घरी तंत्रज्ञानाचे एक्सपोजर यासाठी देण्यात आले की, विद्यार्थ्यांना घरीही तसेच वातावरण मिळावे. त्यासाठी व्हर्च्युअल हायस्कूलही सुरू करण्यात आले. वेळेनंतरही नेटच्या वापराची सुविधा अनेक शाळांत ‌दिली जात आहे. पण याचा फायदा बहुतांश विद्यार्थ्यांना मिळत नाही, कारण शाळांना लॅपटॉप आणि टॅब्लेटसाठी अनुदान इतर स्रोतांवर अवलंबून आहे. जेव्हा ते संपते तेव्हा उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते आव्हान ठरते.

इंग्रजीच्या शिक्षिका सुजैन जॉन्सन म्हणाल्या की, कागदावर आम्हाला असाइनमेंट द्या, असा आग्रह मुले करतात, पण तसे मी करत नाही. माझ्या मते, तसे केल्यास मुले तंत्रज्ञानापासून दूर जातील. भविष्यकाळ तर तंत्रज्ञानाचाच आहे. याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित एका अहवालानुसार, यासाठी होमवर्कचा मुद्दा मोठा झाला आहे कारण शिक्षकांनी दिलेला गृहपाठ ऑनलाइनच ७०% पूर्ण केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्यासाठी स्मार्टफोन, पब्लिक वायफाय किंवा पार्किंगमध्ये मोफत नेटचा वापर करावा लागतो. अनेक शाळा सत्र संपल्यानंतर सुविधा देतात. सार्वजनिक वाचनालयेही होमवर्क पूर्ण करण्यास मदत करतात.

Leave a Comment