रिलायन्स एन्टरटेन्मेंटच्या ३ प्रोजेक्टसाठी करणार काम जे. पी. दत्ता


रिलायन्स एन्टरटेन्मेंट्ससाठी ‘बॉर्डर’, ‘पलटन’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक जे. पी. दत्ता ३ प्रोजेक्टसाठी काम करणार आहेत. २ चित्रपट आणि एका वेबसीरिजचा या प्रोजेक्ट्समध्ये समावेश आहे. जे. पी. दत्ता यांची मुलगी निधी दत्ता हिने या प्रोजेक्टच्या कामाची जबाबदारी घेतली आहे.


या प्रोजेक्टपैकी एक चित्रपट हा ऐतिहासिक विषयावर आधारित राहणार आहे. तर, दुसरा चित्रपट हा काश्मिरच्या सैन्य अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित बायोपिक असणार आहे. तर, तिसरा प्रोजेक्ट हा एक वेबसीरिज आहे. सैन्यदल, नौदल आणि वायुदलातील २१ धाडसी अधिकाऱ्यांच्या कथा या वेबसीरीजमध्ये दाखविण्यात येणार आहेत. या सर्व प्रोजेक्ट्समधील कलाकारांची नावे अद्याप जाहीर झाली नाहीत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment