आमिरच्या मुलीची डेटींग करत असल्याची कबुली


आपण डेटिंग करत असल्याचे बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानची कन्या इरा हिने जाहीर केले आहे. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये गेले अनेक दिवसांपासून दिसणारा मिशाल कृपलानी तिचा बॉयफ्रेण्ड आहे. इराने ‘आस्क मी एनिथिंग’ला उत्तर देताना मिशालला डेट करत असल्याचे कबूल केले आहे.


इरा आपल्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरत असते. काही महिन्यांपूर्वी मिशालसोबतचा फोटो इराने शेअर केल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. चाहत्यांनी संबोधलेला ‘मिस्ट्री मॅन’ इराचा बॉयफ्रेण्ड आहे का, असा प्रश्न अनेक जणांनी कमेंटच्या स्वरुपात विचारला होता.

त्यावेळी इन्स्टाग्रामवर तीन फोटो इराने पोस्ट केले होते. हे फोटो कॅलिफोर्नियातील सांता बार्बरामधले होते. मिशालसारखीच तुमची सुट्टी हसरी गेली असेल, अशी आशा, असे कॅप्शन देताना तिने तीन बदामही जोडले होते. तर दुसऱ्या फोटोत मिशाल इराच्या कपाळावर किस करताना दिसला होता.

Leave a Comment