अर्जुन कपूरच्या शर्टलेस लूकवर काय म्हणते मलायका


सध्या आपल्या आगामी ‘पानीपत’च्या शूटिंगमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर व्यस्त आहे. अर्जुन कपूर आपल्या आगामी चित्रपटासाठी तासनतास वर्कआऊट करत आहे. वर्कआऊट करतानाच फोटो अर्जुन कपूरने सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या फोटोवर त्याची कथित गर्लफ्रेंड मलायका अरोराने कमेंट केली आहे.

या फोटोला अर्जुन कपूरने कॅप्शन देखील दिले आहे, पानीपतच्या युद्धासाठी मी सज्ज झालो आहे. मलायकाने या फोटोला इमोजी दिले आहेत. पानीपतचे दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर करणार असून या चित्रपटाची कथा पानिपतच्या युद्धावर आधारित आहे. संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत.

मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका अर्जुन कपूर यात साकारणार आहे. तर पानिपत या चित्रपटात बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीत आपले प्रस्थ निर्माण करणाऱ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पद्मिनी पानिपत या चित्रपटात गोपिका बाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

View this post on Instagram

Warrior mode on !!! #panipat

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on


अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त दिसणार आहे तर सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिकेत क्रिती दिसणार आहे. तर पानीपत संग्रामाच्यावेळी पार्वतीबाई पतीसमवेत प्रत्यक्ष रणभूमीवर गेल्या होत्या. पार्वतीबाईंची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री क्रिती सॅनॉन देखील मेहनत घेत आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment