अमिताभ बच्चन यांची कार ओएलक्सवर विक्रीला


आपली जुनी गाडी बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे विकत असून त्यांनी आपल्या गाडीचा फोटो जुन्या वस्तू विकणारी वेबसाईट ओएलक्सवर पोस्ट केला आहे. तसेच गाडीचा मालक म्हणूनही अमिताभ बच्चन यांचे नाव यामध्ये दिले असल्यायामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये अमिताभ यांच्या जुन्या कारची जोरदार चर्चा दिसत आहे.

गाड्यांची अमिताभ यांना खूप आवड असल्याचे सर्वांना माहित आहे. अनेक लक्जरी कार अमिताभ यांच्याकडे आहेत. लँड रोव्हर, रेंज रोव्हर, लिक्सस आणि बेंटले कॉन्टिनेंटल जीटी या गाड्याचा त्यामध्ये समावेश आहे. अमिताभही वेळेसह अपग्रेड राहणे पसंत करतात म्हणून ते आपली जुनी गाडी विकत आहेत. 9.99 लाख रुपयात ते आपली जुनी गाडी विकत आहे.

विकत असलेल्या गाडीतून अमिताभ बच्चन यांनी अनेकदा प्रवास केला आहे. ही गाडी थर्ड ओव्हनरद्वारे विकली जात आहे आणि त्यामुळेच या कारची किंमत कमी ठेवली आहे. ही कार 2007 मधील Mercedes-Benz S-Class 350 L मॉडल आहे. येथे L चा अर्थ एक्स्ट्रा व्हील बेस असा होतो. तसेच ओएलक्सवर विकत असलेल्या कारच्या पोस्टमध्ये दावा करम्यात आला आहे की, या गाडीचे मालक अमिताभ बच्चन आहेत.

Leave a Comment