पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आमिर-करीना


आपल्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामुळे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात आता करीना कपूरची देखील एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात करीना मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. आमिर खानने आपल्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. पण या चित्रपटाचे कास्टिंग अद्याप झाले नव्हते. पण आता ‘थ्री एडियट’मध्ये दिसलेली आमिर-करीना ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

करिनाची या चित्रपटात एन्ट्री झाल्याच्या औपचारिक घोषणेनंतर या चित्रपटाचे शुटींग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या संदर्भात ‘बॉलिवूड लाईफ डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात करीनाही असावी, अशी आमिरची इच्छा होती. त्याने यासंदर्भात करीनाला विचारले असता तिनेही याला होकार दिला आहे.

‘इंग्लिश मीडियम’ या चित्रपटाच्या शुटींगसाठी करीना सध्या लंडनमध्ये आहे. ती लंडनहून परतल्यानंतर एका टीव्ही शोमध्येही दिसणार आहे. त्यामुळे हा टीव्ही शो संपल्यानंतरच ती ‘लाल सिंह चड्ढा’चे शुटींग सुरू करू शकेल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा हॉलिवूड स्टार टॉम हॅक्सच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असेल. ऑस्कर अवॉर्डही आपल्या नावावर या चित्रपटाने केला आहे. आता आमिरही याच चित्रपटाचा रिमेक बनवण्यासाठी तेवढीच मेहनत घेत आहे.

Leave a Comment