डीएसपी गीता फोगटच्या फोटोवर चाहते खुश


भारताची प्रसिद्ध रेसलर आणि दंगलफेम गीता फोगाट हिने तिचे डीएसपी युनिफॉर्ममधील फोटो सोशल मिडीयावर शेअर केले असून त्याला तिच्या चाहत्यांकडून खूप लाईक मिळाले आहेत तसेच गीतावर शुभेच्छांचा जणू पाउस बरसला आहे. हरीयानाची रेसलर गीता गेल्यावर्षी पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त झाली असून तिचे सध्या प्रशिक्षण सुरु आहे. त्याचवेळी तिने डीएसपी गणवेशातील सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. पदवीधर असलेल्या गीताने २०१० दिल्ली कॉमनवेल्थ स्पर्धेत कुस्तीत गोल्ड मेडल तसेच अंतरराष्ट्रीय स्पर्धात अनेक मेडल्स मिळविली आहेत.


भारतात क्रिकेटशिवाय अन्य खेळांना तसेच खेळाडूंना जादा पैसा व प्रोत्साहन मिळत नाही अशी नेहमीच हाकाटी केली जाते. क्रिकेट मध्ये पैसा आहे आणि क्रिकेट खेळाडूंचे हित जपणारी भक्कम संस्था आहे तशी बाकीच्या खेळांबाबत नाही. या खेळांनाही प्रेक्षक आणि सरकार यांच्याकडून प्रोत्साहन हवे आहे. सरकार त्यादृष्टीने प्रयत्नशील असून अनेक गुणी खेळाडूंना सरकारी नोकऱ्यात सामावून घेतले जात आहे. या योजनेतूनच गीताला हरियाना पोलीस मध्ये उपअधीक्षक म्हणून नियुक्त केले गेले आहे. तिचे नउ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे तेव्हा तिने गणवेशातील फोटो शेअर करून त्याखाली हरियाना पोलीस, डीएसपी, पोलीसवूमन, अंडरट्रेनिंग असे टॅग केले आहे.

कॉमनवेल्थ गेममध्ये गीताने २०१० साली गोल्ड बरोबरच कॉमनवेल्थ चँपियनशिप २००९, २०११ मध्ये गोल्ड, २०१३ मध्ये सिल्व्हर, वर्ल्ड चँपियनशिप २०१२ मध्ये कांस्य व एशियन चँपियनशिप २०१२ व २०१५ मध्ये कांस्य पदक पटकावले आहे. गीताने पवनकुमार यांच्याबरोबर गेल्या वर्षी विवाह केला असून पवनकुमार सुद्धा रेसलर आहे. त्याने २०१४ च्या ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासाठी कांस्य पदक मिळविले आहे.

Leave a Comment