पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सचिन तेंडुलकरने मानले आभार


नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी मालदीवला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली होती. मोदींनी त्यावेळी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालेह यांना एक खास बॅट दिली आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या या बॅटवर होत्या. सालेह यांना बॅट देतानाचा फोटो मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते.


सचिनने या फोटोवर आपली प्रतिक्रिया देताना ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्यात लिहीले आहे की, क्रिकेटचा प्रचार मालदीवमध्ये केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. क्रिकेटच्या नकाशावर लवकरच मालदीव पाहायला मिळण्याची आशा आहे. आयपीएलच्या एका सामन्याला मालदीवचे राष्ट्रपती सालेह हे हजर राहिले होते. तेव्हा त्यांनी मालदीवमध्ये एक क्रिकेटचा संघ असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.

Loading RSS Feed

Leave a Comment